शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या
परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत - जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
खासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|